esakal | बारामतीमधील कोरोनाबाधितांच्या आजच्या 'या' आकड्याने उडविली सर्वांचीच झोप 
sakal

बोलून बातमी शोधा

corona-g.jpg

आजचा दिवस बारामतीसाठी काळा दिवसच ठरला. आज सकाळी 9 आणि दुपारी 9 असे एकूण 18 रुग्ण एकाच दिवशी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सर्वांची झोप उडाली आहे.  

बारामतीमधील कोरोनाबाधितांच्या आजच्या 'या' आकड्याने उडविली सर्वांचीच झोप 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : आजचा दिवस बारामतीसाठी काळा दिवसच ठरला. आज सकाळी 9 आणि दुपारी 9 असे एकूण 18 रुग्ण एकाच दिवशी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सर्वांची झोप उडाली आहे.  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आज सकाळी 9 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. याच वेळेस उर्वरित 25 रुग्णांपैकी पुन्हा 9 रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. उर्वरित सर्व रुग्ण हे वसंतनगर परिसरातील परिचारिकेच्या संपर्कातील असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

आता बारामतीतील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 58 वर पोहोचला असून 4 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असून 22 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. आज एकाच दिवशी 18 रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने आता पुढे काय निर्णय घ्यायचा या संदर्भात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्य दालनात आज बैठक सुरु होती. 

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

लवकरच या बाबत काहीतरी निर्णय होणे अपेक्षित असले तरी अजून प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर समूह संसर्गाचा धोका असून त्याद्वारे अनेकांना कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. 

गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा अशा स्वरुपाच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. आता प्रशासन बारामती बाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा