पुणेकरांनो, सिंहगडला जाताय? घाट रस्त्यावर 'ही '18 ठिकाणे धोकादायक

18 places dangerous on Sinhagad Ghat road
18 places dangerous on Sinhagad Ghat road

पुणे : सिंहगड घाट रस्त्यात 18 ठिकाणे संवेदनशील आणि धोकादायक असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. यासाठी मुंबई येथील आयआयटी संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच वन विभागाला प्राप्त झाला. दरम्यान, तेथे टप्प्याटप्प्याने संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे, असेही सांगण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

सिंहगडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्यात दरडी कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने संरक्षक जाळ्या बसविण्यात येत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी वन विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल. घाट रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे.
सध्या बाजारात उत्तम दर्जाचे डांबर उपलब्ध नसल्यामुळे हे काम रखडले आहे. हे काम मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com