खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली मोठी मागणी

खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली मोठी मागणी

नारायणगाव : कोरोनाचा प्रसार वाढला आहे.लॉकडाऊन टाळण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे.केंद्रीय अहवाला नुसार बारा एप्रिल नंतर कोरिना बाधिताच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा धोका आहे.अठरा वर्षांच्या पुढील युवकांना कोरोना लसीकरण करण्याची गरज असून आपण या बाबतची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. कोरोना संसर्ग व उपाययोजना या बाबतचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी नारायणगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ''कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात रुग्णांसाठी बेड शिल्लक नाही. बेड मिळत नाही म्हणून रुग्णांचा मृत्यू होतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय अहवालानुसार बारा एप्रिलनंतर कोरिना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा धोका आहे. बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्थचक्र ठप्प होऊ नये म्हणून लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाने धार्मिक विधी, विवाह सोहळा, दशक्रिया, अंत्यसंस्कार आदी साठी संख्येचे निर्बंध लादले आहेत. 

कोरोनाचा प्रसार रोखणे, मृत्यू दर कमी करणे, कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जुन्नर तालुक्यात लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. लेण्याद्री येथील कोरोना उपचार केंद्रात ३३४ रुग्ण दाखल असून या ठिकाणी बेड शिल्लक नाही. २५६ रुग्ण होम आयसोलेशन आहेत. ओझर येथील कोरोना उपचार केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लेण्याद्री व ओझर येथील कोरोना उपचार केंद्रात ६२० बेडची व्यवस्था करण्यात येईल. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी तालुक्यातील खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. या साठी आयएमएचे डॉ. सदानंद राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com