

Rare Mahogany Tree Faces Damage; Locals Demand Action Against Culprits
sakal
पिंपळवंडी : हिवरे (ता. जुन्नर) येथे बॉम्बे प्रेसिडेंसीचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी १८० वर्षांपूर्वी स्वहस्ते लावलेला ऐतिहासिक महोगनी वृक्ष सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वृक्षाचे खोड जाळण्यासह फांद्या तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.