esakal | पुण्यात आज 181 ठिकाणी लसीकरण; जाणून घ्या कुठल्या केंद्रावर कोणती लस
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुण्यात आज 181 ठिकाणी लसीकरण; जाणून घ्या कुठल्या केंद्रावर कोणती लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतर्फे (Municipal) उद्या (मंगळवारी) शहरात १८१ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Preventive Vaccination) केले जाणार आहे. यामध्ये १५१ ठिकाणी कोव्हीशील्डच्या (Covishield) ४५ ते पुढील वयोगटासाठी नियोजन केले आहे. १५ ठिकाणी कोव्हीशील्डत्या ३० ते ४४ वयोगटासाठी तर १५ ठिकाणी कोव्हॅक्सीनच्या (Covaxin) १८ ते पुढील वयोगटासाठीचे नियोजन केले असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी सकाळी ८ वाजता लिंक खुली होईल. (181 Places Vaccination in Pune City)

कोव्हीशील्ड (४५ ते पुढील वयोगट)

- ज्यांनी ३० मार्च पूर्वी पहिला डोस (८४ दिवस) घेतला आहे त्यांना २० टक्के लस ऑनलाईन नोंदणी द्वारे उपलब्ध.

- फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस राखीव

- ३० टक्के लस ऑनलाईन नोंदणी करून आलेल्यांच्या पहिल्या डोससाठी

- ३० टक्के लस फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव

कोव्हीशील्ड (३० ते ४४ वयोगट)

- ५० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

कोव्हॅक्सीन (१८ ते पुढील वयोगट)

- २४ मे पूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार

-५० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

loading image