
PM Surya Ghar Yojana
Sakal
पुणे : वीजबिल वाढविण्यापेक्षा घराच्या छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प उभारून वीजबिल शून्य करण्याचा पर्याय १८ हजार ६९४ पुणेकरांनी निवडला आहे. या योजनेतून त्यांना १५१ कोटींचे अनुदान मिळाले असून, ९०.६२ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होत आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.