esakal | केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार धान्य; जिल्ह्यात एक मेपासून वाटप होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

From 1st May Grains were distributed to more than 3 lakh orange ration card holders.jpg


राज्य सरकारने केशरी कार्डधारकांनाही गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे आता केशरी कार्डधारकांनाही रास्त दरात गहू आणि तांदूळ देण्यात येणार असून, त्याचे वितरण येत्या एक मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणार धान्य; जिल्ह्यात एक मेपासून वाटप होणार सुरु

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन दुकानातून गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या एक मेपासून केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील हवेलीसह 11 तालुक्यामध्ये सध्या अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे धान्य वितरित करण्यात येत आहे. या महिन्यातील सुमारे 90 टक्के लाभार्थ्यांना गहू-तांदूळ वितरित करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान कल्याण योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे.सुमारे 80 टक्के कार्डधारकांना मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. सर्व कार्डधारकांना एप्रिल ते जून दरम्यान त्या त्या महिन्यात मोफत तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने केशरी कार्डधारकांनाही गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे आता केशरी कार्डधारकांनाही रास्त दरात गहू आणि तांदूळ देण्यात येणार असून, त्याचे वितरण येत्या एक मेपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
केशरी कार्डधारकांना गहू प्रतिव्यक्ती तीन किलो तर, तांदूळ प्रति व्यक्ती दोन किलो मिळणार आहे. केशरी कार्डधारकांसाठी गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि तांदूळ प्रति किलो 12 रुपये दराने मिळणार आहे.

धान्य वाटपात अनियमितता, गुन्हा दाखल
जुन्नर तालुक्यात तपासणीदरम्यान एका रेशन दुकानांमध्ये धान्य वाटपात अनियमितता आढळून आली. त्यामुळे संबंधित रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.
 

loading image
go to top