मायबाप, आम्हालाबी द्या की लस!

पुणे जिल्ह्यात २० लाख नागरिकांचे लसीकरण अद्याप बाकी
vaccination
vaccinationGoogle

पुणे : पुणे जिल्ह्याच्या(Pune District) ग्रामीण भागातील(Rural Area) सुमारे २० लाख नागरिकांचे(citizen) कोरोना लसीकरण (Corona Prevarication Vaccination) बाकी राहिले आहे. सध्या लसीच्या उपलब्धते अभावी दैनंदिन लसीकरणाचा वेग खूपच मंदावला आहे. सध्या रोज सरासरी सुमारे दहा हजार नागरिकांचेच लसीकरण पूर्ण होत आहे. लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास लसीकरण पूर्ण होण्यासाठी किमान आणखी सात महिने लागणार आहेत.(20 lakh citizens are yet to be vaccinated in Pune district

आतापर्यंत ग्रामीण भागातील १० लाख ५५ हजार १५७ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ८ लाख ८९ हजार ८८७ जणांचा पहिला डोस तर, उर्वरित १ लाख ६५ हजार ३७० जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

vaccination
पुण्यात साधे पेट्रोलही शंभर रुपयांच्या घरात

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारयादीनुसार अठरा वर्षे वयापुढील २८ लाख ७८ हजार ४०४ जण लसीकरणासाठी पात्र आहेत. शिवाय याआधी अनेकांना कोवॅक्सिन लस देण्यात आलेली आहे. कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना लसीअभावी दुसरा डोस मिळणे दुरापास्त झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला. या टप्प्यात ६० वर्षांपुढील सर्व आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यास सुरवात करण्यात आली. त्यातच १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना सरसकट लस देण्यासाठीचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या तीनही टप्प्यातील सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झालेले नसतानाच १ मेपासून चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या चौथ्या टप्प्यात १८ वर्षांपुढील सर्वांना सरसकट लस दिली जात आहे.

vaccination
पुण्यात ऑक्सिजनची बचत करण्यावर भर

तालुकानिहाय शिल्लक लसीकरण

- आंबेगाव --- १ लाख ४ हजार ७२६

- बारामती --- १ लाख ८५ हजार ७३१

- भोर --- ६१ हजार २१७

- दौंड --- १ लाख ८१ हजार १४२

- हवेली --- ३ लाख ४९ हजार ७७०

- इंदापूर --- १ लाख ६४ हजार ४४६

- जुन्नर --- १ लाख ४० हजार ३५९

- खेंड --- १ लाख ४८ हजार २१६

- मावळ --- १ लाख ७४ हजार ०६९

- मुळशी --- ४९ हजार १४३

- पुरंदर --- १ लाख २६९

- शिरूर --- १ लाख ९५ हजार ८३६

- वेल्हे --- १४ हजार ३२२

- पुणे कॅंटोन्मेंट --- ४४ हजार ६८

- खडकी कॅंटोन्मेंट --- ५२ हजार ७७५

- देहू कॅंटोन्मेंट --- ३४ हजार ६३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com