
Pune Crime
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर मंगळवारी (ता. १४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका २० वर्षीय तरुणीचा अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.