esakal | लिहिता न येणाऱ्या बायकांनी उभी केली २०० कोटींची बँक I Maan Deshi Bank
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Deshi Bank

लिहिता न येणाऱ्या बायकांनी उभी केली २०० कोटींची बँक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रोज पाच रुपयांच्या बचतीसाठी एकाही बँकेने दारात उभं केलं नाही. म्हणून, बचतीच्या मूलभूत हक्कासाठी माणदेशी बँक सुरु करण्याचा विडा बायकांनी उचलला. अशिक्षित बायकांना बँकेचा परवाना कसा द्यायचा, असे रिझर्व्ह बँकेने विचारल्यावर, 'आम्हाला लिहिता वाचता येत नाही, पण मोजता येत.' असं ठणकावून सांगणाऱ्या बायकांनी आज २०० कोटींची बँक उभी केली, असा प्रवास माणदेशी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना गाला सिन्हा यांनी उलगडला.

सहकार क्षेत्रातील सकाळ महाकॉनक्लेव्ह मध्ये त्यांनी माणदेशी बँकेचा आणि माणदेशी महिलांच्या स्वावलंबनाचा प्रवास उलगडला. मूळच्या मुंबईच्या असलेल्या चेतना, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून प्रेरित होऊन म्हसवडच्या साथी कार्यकर्ता विजयशी लग्न करतात. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी महिलांच्या शौचालयाचा गंभीर प्रश्न त्यांच्या लक्षात येतो. गावातील देवळात जाऊन पुरुषमंडळींची जागृती आणि प्रसंगी उपोषण करून त्या हा प्रश्न सोडवतात. आणि तेथूनच सुरु होतो महिला स्वावलंबनाचा लढा. त्या म्हणाल्या,"सहकारी बँका या केवळ पैशाच्या वापरासाठी नाही. तर स्वतःच्या पैशावर अधिकार आणि नियंत्रण मिळवण्याची संधी देतात. केवळ आर्थिक सेवा नाही तर सभासदांच्या स्वावलंबनाचे कार्य सहकारी बँका करतात."

हेही वाचा: पुणे: उत्पन्न वाढीसाठी कमी व्याजदरांच्या ठेवी वाढवा

लोकांची निंदा सहन केली..

बचतीच्या मूलभूत हक्कसाठी महिलांनी जेंव्हा बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हा व्यवस्थेने तर त्रास दिला, त्याही पेक्षा गावागावातील पुढाऱ्यांनी चेष्टाही केली. 'यांना कचऱ्या इतकीही किंमत नाही, त्या बँक काढायला निघाल्या. या कचरा बँक काढणार." अशी निंदा झाली. आज बँकेच्या त्या संस्थापक सदस्या मोठ्या अभिमानाने यशस्वीपणे बँक चालवत आहे.

बायकांनी शिकवलं :

आपण पुस्तकात वाचून किंवा मोठ्या बँकांचे पाहून अनुकरण करतो. पण माणदेशी उभी राहण्यासाठी बायकांनी बँकिंग शिकवली. 'धाडस हेच तुमचं भांडवल' हे मला या महिलांनी शिकवल. आज आमच्या अडत्या, डिजिटल बँकिंगच्या सल्लागार, मुख्य कार्यकारी अधिकारी या महिला आहेत. एवढंच काय माणदेशी रेडियोच्या प्रसिद्ध रेडिओ जॉकीया निरक्षर महिला आहे. त्यांच्याकडूनच मी वास्तवदर्शी बँकिंग शिकले. म्हणून आज कोवीड मध्येही आम्ही 8 लाखाचा नफा कमावला, म्हसवडच्या शाखेत ११ हजार महिला मोबाईल बँकिंग करत आहे. १२ कोटींचे कॅश क्रेडिट बँक उपलब्ध करून देते, असे गाला सिन्हा यांनी सांगितले.

हेही वाचा: बारामतीत सहायक पोलिस उपनिरिक्षकास लाच घेताना अटक

डोळ्यात अश्रू तरळले..

माणदेशी बद्दल सांगायला सार जग फिरले. आज प्रथमच मराठीत बोलत आहे. आपल्याच भाषेत आपला प्रवास उलगडून सांगताना आंनद होतोय, असे म्हणून चेतना गाला-सिन्हा यांनी भाषण थांबवले. आणि सभागृहाने उभे राहून टाळ्याचा कडकडाट केला. मंचावरून उतरणाऱ्या चेतना थबकल्या, हातात माईक घेत, अश्रू पुसत त्या म्हणाल्या,"मराठी भाषिकांची स्टेण्डिंग ओव्हेशन मिळालं, माझ्या मातीतील हा सन्मान मोलाचा आहे."

loading image
go to top