
पुणे : शहरात सहा वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील सोसायट्या, वस्त्यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर महापालिकेने सीमाभिंत बांधण्यासाठी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पाच मतदारसंघातील ओढे-नाल्यांच्या सीमाभिंती बांधण्यासाठी सरकारने २०० कोटी मंजूर केले. मात्र, अद्याप एक रुपयाही महापालिकेला मिळालेला नाही.