रेल्वेच्या 200 गाड्यांत महाराष्ट्रातील प्रवासाचे तिकिट नाहीच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

रिफंड देण्यास सुरवात 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेची वाहतूक 25 मार्चपासून बंद आहे. या काळात रद्द झालेल्या प्रवासी वाहतुकीच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे पैसे 25 मे पासून रेल्वे स्थानकावर देण्यास सुरवात झाली आहे. रिफंड पुढील सहा महिन्यांपर्यंत मिळणार आहे.

पुणे : एक जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रातंर्गत प्रवासासाठी तिकिट देण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वे प्रवास शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबई- पुणेही रेल्वे प्रवास कोणाला करता येणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने देशात 1 जूनपासून मर्यादीत प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशातून विविध भागात प्रवास करण्यासाठी 200 रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बांद्रा टर्मिनसवरून त्यातील 14 गाड्या सुटणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुवनेश्वर, दरभंगा, वाराणसी, गदग, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, पाटलीपूत्र आदींचा त्यात समावेश आहे. या मार्गावरील 14 गाड्या मुंबईलाही परतणार आहेत. तसेच पुण्यातून पुणे- पाटना ही गाडी एक जूनपासून सुरू होणार आहे. तसेच मुंबई - भुवनेश्वर कोनार्क एक्स्प्रेस, निजामुद्दीन- गोवा, मुंबई - हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, मुंबई- गदग आदी गाड्या पुण्यातून पुढे जाणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईवरून एकूण 28 गाड्यांची वाहतूक होणार असून, त्यातील 10 गाड्या पुण्यावरून जाणार आहेत. मात्र, या गाड्यांना पुणे- मुंबई किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही मार्गावरील प्रवासाचे तिकिट देता येणार नाही. तसेच महाराष्ट्रातंर्गत प्रवासही करता येणार नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. त्यामुळे या गाड्या पुणे स्थानकावर थांबल्या तरी, प्रवाशांना महाराष्ट्राबाहेरील तिकिट काढून प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवास करायचा आहे, ते महाराष्ट्राबाहेरील तिकिट काढतील आणि हव्या असलेल्या स्थानकावर उतरतील, अशीही भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली. त्यावर रेल्वे प्रशासन नियंत्रण कसे ठेवणार, हाही प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी नियोजीत वेळेपूर्वी सुमारे 90 मिनिटे अगोदर प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर पोचावे, चेहऱयावर मास्क बंधनकारक आहे, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षणाच्या तीन खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रवाशांना आरक्षण मिळेल, असेही झंवर यांनी सांगितले.  

रिफंड देण्यास सुरवात 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेची वाहतूक 25 मार्चपासून बंद आहे. या काळात रद्द झालेल्या प्रवासी वाहतुकीच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांचे पैसे 25 मे पासून रेल्वे स्थानकावर देण्यास सुरवात झाली आहे. रिफंड पुढील सहा महिन्यांपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी एकदम गर्दी करू नये, असे आवाहन झंवर यांनी केले. ज्या
प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने तिकिट, आरक्षण घेतले असेल त्यांनी तिकिट खिडकीवर येऊ नये. त्यांना ऑनलाईन पद्धतीनेच रिफंड मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 200 Rails Tickets Not allot Maharashtra Locations