
RSS march
Sakal
पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ च्या विजयादशमीला (२ ऑक्टोबर) १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून पुणे महानगरात संघ शक्तीचे सादरीकरण होणार आहे. त्यांतर्गत शहराच्या विविध भागांतून ७७ पथसंचलने आणि ८४ उत्सव होणार आहेत. त्यात २० हजारांहून अधिक स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.