फेब्रुवारी यंदा गेल्या वर्षीपेक्षा थंड; पुण्यात पारा घसरला

2021 February is colder than last year.jpg
2021 February is colder than last year.jpg

पुणे : पुण्यात यंदाचा जानेवारी उबदार राहिला. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी जास्त थंडी पडली. मागील वर्षी १ ते २१ फेब्रुवारी दरम्यान किमान तापमानाची सरासरी १४.९ अंश सेल्सिअस होती. तर, यंदा १२.४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाली.

पुण्याच्या हवामानाने २०२१ मध्ये नवे विक्रम केले. त्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात १९४८च्या जानेवारीच्या एका दिवसातील आणि महिन्यातील पावसाचा उचांक मोडला. संपूर्ण महिन्यात थंडी गायब होती. त्यामुळे चार दशकातील सर्वांत उबदार महिना असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला. या संपूर्ण महिन्यात किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली उतरला नाही, असेही निरीक्षण नोंदले. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीतील २१ दिवसांमधील किमान तापमानाची तुलना यंदाच्या याच दिवसांशी केली. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे. रथ सप्तमी झाली तरीही हवेतील गारठा कमी होऊ लागतो. किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जातो. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या २१ दिवसांमध्ये एकही दिवस किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या खाली गेले नाही. यंदा मात्र २१ पैकी ६ दिवस किमान तापमान ११ पेक्षा कमी नोंदले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
शहरातील वीज ग्राहकांकडे एक कोटी थकबाकी; महावितरणची वसुलीसाठी ग्राहकांच्या...

का पडली थंडी?
- उत्तर भारतात थंडीची लाट कायम
- उत्तरेतून महाराष्ट्राच्या, पुण्याच्या दिशेने वाहणारे थंड आणि कोरडे वारे
-अवकाळी पावसानंतर हवेत वाढलेला गारठा
- बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने निरभ्र झालेले आकाश


फेब्रुवारीतील थंडी
- पुण्यातील फेब्रुवारीमधील आतापर्यंतचे सर्वांत कमी तापमान १ फेब्रुवारी १९३४ रोजी नोंदले आहे. त्या दिवशी किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस झाली.
- ९ फेब्रुवारी २०१९ : ५.१
- ९ फेब्रुवारी २०१२ : ४.६


पुण्याचा हवामान अंदाज
- पुणे शहर आणि परिसरात पुढील सहा दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
- किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जाईल
- कमाल तापमानाचा पारा ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com