खडकवासला धरणक्षेत्रात जून महिन्यात किती पाऊस पडला; वाचा सविस्तर

khadakwasla.jpg
khadakwasla.jpg

खडकवासला : खडकवासला धरणात यावर्षी जून महिन्यात 204 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या 28.93 टक्के पाऊस झाला आहे. मागील पंचवीस वर्षात जूनमध्ये जास्त पाऊस पडल्याच्या क्रमवारीत यंदाचा पडलेला पाऊस अकराव्या स्थानावर आहे. 

दरवर्षी राज्यात माॅन्सूनचे आगमन 7 जून रोजी होत असते. अरबी समुद्रातील वाऱ्याच्या परिस्थितीमुळे पाऊस येण्याची वेळ पुढे माहे होते. पण पाटबंधारे विभागाकडे मात्र एक जूनपासून पाऊस पडल्याची नोंद करीत असते. पाऊस मोजण्याचे वर्षही देखील एक जूनपासून 31 मे पर्यत असते. मागील पंचवीस म्हणजे 1996 पासून यावर्षी 2020 पर्यंत पाऊस पडलेल्या नोंदी खडकवासला पाटबंधारे विभागाकडे आहेत.

त्यानुसार, खडकवासला धरण येथे 2005 मध्ये जून महिन्यात 319 मिलिमीटर पाऊस पडला होता. 1996 मध्ये 313 तर 2005 मध्ये 291 मिलिमीटर पाऊस पडला होता. जून महिन्यात सर्वात कमी पाऊस 2009 मध्ये 24 मिलिमीटर, 2014 मध्ये 25, तर 2012 मध्ये 32 मिलिमीटर पाऊस पडला होता. 

खडकवासला धरणात पावसाची सरासरी 705 मिलिमीटर आहे. 
यंदा जून महिनाअखेर 204 मिलिमीटर म्हणजे 28.93 टक्के पाऊस झालेला आहे. पानशेत धरणात दरवर्षी सरासरी दोन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. 30 जून अखेर 355 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या 17.75 टक्के झाला आहे. वरसगाव धरणात दरवर्षी दोन हजार मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडत असतो. यंदा 347 मिलिमीटर पाऊस पडला असून, तो सरासरीच्या 17.35 टक्के आहे टेमघर येथे सरासरी 2400 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा 523 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या 21.19 टक्के पाऊस झालेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील धरणसाठा स्थिती
धरणाचे नाव- आजचा पाऊस/ उपयुक्त साठा (टीएमसी)/ टक्केवारी
खडकवासला- 0/1.19/60.26
पानशेत- 0/2.16/20.28 वरसगाव- 0/1.71/13.36
टेमघर- 0/0.15/4.09
चार धरणाची एकूण 5.21 टीएमसी म्हणजे 17.89 टक्के
मागील वर्षीच्या एकूण पाणीसाठा
3.67 टीएमसी म्हणजे 12.58 टक्के.

खडकवासला धरणातील जून महिन्यातील मागील 25 वर्षात पडलेल्या पाऊस

वर्ष/जूनमधील पाऊस
1996/319
1997/266
1998/122
1999/102
2000/207
2001/84
2002/276
2003/170
2004/244
2005/313
2006/177
2007/235
2008/95
2009/24
2010/154
2011/216
2012/32
2013/269
2014/25
2015/291
2016/236
2017/144
2018/161
2019/234
2020/204

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com