

Crumbling ₹21-Crore Road Raises Alarm Before Sant Tukaram Maharaj Palkhi
esakal
-कृष्णकांत कोबल
मांजरी: उघडलेली खडी आणि पायलिंगचे खड्डे यामुळे पुणे-सोलापूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. हडपसर रवीदर्शन ते कवडीपाट टोलनाका या सुमारे पाच किलोमीटर अंतरातील डांबरीकरण उखडून सर्वत्र खडी पसरली आहे. तसेच पायलिंगचे खड्डे पूर्ववत न केल्याने तेही उखडून त्याठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. या भागातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी सोहळ्याला केवळ तीन दिवस बाकी असून वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनासमोर पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे आव्हान निर्माण झाले आहे.