पुरंदरकरांची डोकेदुखी वाढली, का ते वाचा... 

purandar.jpg
purandar.jpg
Updated on

सासवड : तोंडल (ता. पुरंदर) येथील तब्बल 22 जण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याची घटना उघड झाल्याने कोरोनामुक्त पुरंदरची डोकेदुखी वाढली आहे. तीन दिवसांपासून हे सारे तपासणीच्या प्रतिक्षेत सासवडच्या 'कोविड केअर सेंटर ' मध्ये ठेवले आहेत. त्यांचे नमुने उद्या घेऊन कोरोनाबाबत तपासणीला पाठविले जाणार आहेत; असे पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी आज सांगितले.

याबाबत माहिती अशी की, हा बाहेर गावचा पाहुणा बाधीत रुग्ण 27 एप्रिलला तोंडल गावात औषधे देण्यासाठी येऊन गेला होता. तो बाधित असल्याचे नंतर दोन दिवसांनी समजल्यावरुन सारे संदर्भ तपासून आरोग्य विभागाने संपर्कातील 22 जण शोधले व पुढील हालचाल सुरु केली होती. पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.

तोंडल (ता.पुरंदर) गावातील हे कोरोना बाधीताच्या संपर्कातील 22 जण शोधुन आरोग्य विभागाने त्यांना 'कोविड केअर सेंटर ' मध्ये (ता. 30) रोजीच ठेवले. सेंटरमधूनच या निरीक्षणातील 22 जणांचे स्राव सोमवारी पुण्याला पाठविण्यात येतील; असे तहसीलदार सरनौबत यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील कोणीही आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये; असेही तहसीलदार सरनौबत यांनी स्पष्ट केले. पुरंदर तालुक्यात आतापर्यंत 18 लोक कोरोना संशयित होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आता तोंडलच्या या बावीस जणांच्या तपासणीकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बावीसपैकी एक ज्येष्ठ वेगळ्या व्याधीने ग्रस्त असल्याने, त्याच्या सोबत दोनजण औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. तोंडल हे गाव पुरंदर तालुक्यातील अगदी टोकाचे आहे. नीरा नदीच्या व वीर धरणाच्या काठावर भोर व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर गाव आहे. तालुक्यात वीर व परीसरातील गावे वगळता या तोंडल गावाचा तसा तालुक्याशी तुलनेत संपर्क कमी असतो. तरीपण आतापर्यंत कोरोनामुक्त या तालुक्याची काहीशी डोकेदुखी वाढलीच आहे; असे सध्या तरी म्हणावे लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com