esakal | Video : लॉकडाऊनवाली शादी...! चक्क पोलिसांनीचं केलं 'तिचं' कन्यादान
sakal

बोलून बातमी शोधा

hadpsar1

वर व वधूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्‍य झालं नाही.

Video : लॉकडाऊनवाली शादी...! चक्क पोलिसांनीचं केलं 'तिचं' कन्यादान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : वर व वधूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्‍य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. या वर व वधूचे पालक सैन्य दलात असून मुलाचे वडील देहराडूनला कर्नल या पदावर असून मुलीचे वडील नागपूर येथे सैन्यदलामध्ये डॉक्‍टर असून कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्यामुळे या लग्नाला हजर राहू शकत नव्हते. 

आणखी वाचा- वारजे माळवाडीतील 32 पैकी 29 जणांचा रिपोर्ट...

सैन्य अधिका-यांच्या विनंतीला मान देऊन हडपसर पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न पार पाडलं. हा विवाह ऍमेनोरा क्‍लबमध्ये पार पडला. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे हडपसर पोलिसांनी या वधूचे कन्यादान केले. 
हडपसर येथील वर मुलगा आदित्यसिंग बिस्ट व वधू मुलगी नेहा कुशवा यांचे हडपसर पोलीस स्टेशनने पालकत्व स्वीकारून दोघांचे लग्न लावून दिले. मुलगा आयटीमध्ये असून मुलगी डॉक्‍टर आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

दोघांच्याही पालकांनी देशात चालू असलेल्या लॉकडाऊन व कोरोना संक्रमणामुळे ते लग्नाला पुण्यात येऊ शकत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना फोन करून सदर वधू-वरांचे पालकत्त्व हडपसर पोलिसांनी घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती लक्षात घेऊन व दोन्ही कुटुंब हे देशसेवेत व्यग्र असल्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊन हडपसर पोलिसांनी हा लग्न सोहळा पार पडला. 

&

पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न पार पाडलं. या लग्नाला परिमंडळ 5 चे पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे उपस्थित होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केले.

loading image
go to top