Pune Crime: धक्कादायक! पुण्यात प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

Murder
Murder sakal

पुणे: शहरात प्रेम प्रकरणातून एका तरुणाने तरुणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील औंध भागात ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. श्वेता रानवडे (२२) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्वेता ही औंध परिसरात सिध्दार्थनगर भागात वास्तव्यास होती. प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन तिचे एका तरुणाशी आज वाद झाले. त्यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. तरुणीवर वार केल्याने ती रक्ताच्या थारोळयात पडलेली. या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले.

Murder
Sanjay Raut News: 'रेशीम बाग हादरलं!'; संजय राऊतांच्या सुटकेनंतर कॉंग्रेसने भाजपला डिवचलं

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेताचे व संशयित आरोपी प्रतिक ढमाले (२५ वर्षे) याचे प्रेम संबंध होते. परंतु त्याचे वर्तन चांगले नसल्याने श्वेताने लग्नास नकार दिल्याने चिडून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. श्वेताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून आरोपीने तिचा खून केला. घटनेची माहिती कळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.

या कृत्यानंतर संबंधित संशयित तरुण पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.

Murder
Sanjay Raut Bail : PMLA कोर्टाने 'ईडी'ला झापलं! राऊतांची अटक बेकायदेशीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com