दिलासादायक : पुणे जिल्ह्यातील 22 हजार दिव्यांगाना मिळणार मोफत रेशन 

restion11.jpg
restion11.jpg
Updated on

मंचर : पुणे जिल्ह्यातील साठ टक्‍क्‍यापेक्षा कमी दिव्यांग असलेले 22 हजार व्यक्ती पुणे जिल्हा परिषदेच्या मोफत रेशनिंग लाभापासून वंचित राहिले होते. त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. अपंग हित, विकास व पुनर्वसन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून व्यथा मांडली. त्यानंतर दोन दिवसांनी पुणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांची माहिती संकलित करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेने सर्व पंचायत समित्यांना दिले आहेत.

डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात 22 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. पुणे जिल्हा परिषद पाच टक्के दिव्यांग निधीतून जे साठ टक्‍क्‍यापेक्षा जास्त दिव्यांग आहेत. त्यांना दरमहा एक हजार रुपये निर्वाह भत्ता देत आहेत. त्यांनाच कोरोना विषाणू प्रादुर्भाव व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोफत रेशनिंग धान्य किट मिळणार आहे. परंतु 40 ते 69 टक्के दिव्यांग असणारे 22 हजार लाभार्थी धान्याच्या किट पासून वंचित असल्याची माहिती ढोबळे यांनी डॉ. कोल्हे यांना दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

"जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा झाली असून सर्व दिव्यांग व्यक्तींना धान्याचे किट देण्यात येईल. जिल्ह्यातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती रेशनिंग पासून वंचित राहणार नाही, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.' त्यानंतर दोनच दिवसात सर्व प्रकारच्या दिव्यांगांची माहिती संकलन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने सर्व पंचायत समित्यांना दिले आहेत. सध्या प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत दिव्यांगांची माहिती संकलित केली जात आहे. नव्याने सर्वेक्षण होणाऱ्या दिव्यांगाना धान्याचे वाटप होईल, असे ढोबळे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com