कोरोना पाठोपाठ आळंदीत आता 'हे' संकट

corona logo
corona logo
Updated on

आळंदी (पुणे) : मादी बिबट्या आणि बछड्याने गावातील कुत्र्यांचा फडशा पाडून उसाच्या शेतात तब्बल दोन आठवडे दबा धरला. बिबट्याने थेट नागरी वस्तीतील शेतात दबा धरल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली. आधीच राज्यभरात थैमान मांडलेल्या कोरोनाने हैराण झालेले धानोरेकर बिबट्यामुळे भयभीत झाले आहेत. 

आळंदीपासून अवघ्या तीन किलोमीटर वरील अंतरावर धानोरे गाव आहे. यामुळे आता आळंदीसारख्या शहरातही बिबट्या दिसला तर नवल वाटायला नको अशीच परिस्थिती आहे. आळंदी परिसरातील धानोरे, मरकळ, गोलेगाव, कोयाळी भागात बिबटे आणि बछडे यांचा वावर असल्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी पाहिले. 

आता मागील काही दिवसांपासून मादी बिबट्या धानोरे येथील उसात दबा धरून होता. रात्रीच्या वेळी गावातील कुत्र्यांचा फडशा पाडत आहे. वनविभागाचे अधिकारी नितीन खताळ यांनी सुरुवातीला बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मात्र, सोबत बछडा असल्याने नंतर पिंजरा काढून टाकला. त्यानंतर खताळ यांनी स्थानिकांना बिबट्याबाबत मार्गदर्शन केले. यापूर्वी मरकळ येथे बिबट्याचा मृत्यू झाला तर कोयाळी येथेही उसाच्या फडात बिबट्या लपला होता.

नागरिकांनी जाळे लावून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाळ्यातून निसटून पळाला. आता धानोरे गावात बिबट्या आल्याने लगतच असलेल्या आळंदीसारख्या शहरी भागातही बिबट्याचे दर्शन झाले तर आश्‍चर्य वाटायला नको. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याबाबत वन विभागाचे अधिकारी खताळ यांनी सांगितले की, "धानोरे येथे बिबट्याचे ठसे आढळल्याने त्याचा वावर निश्‍चितच झाला. सोबत बछडा असल्याने बिबट्याचा उपद्रव नव्हता. मात्र, त्याच्या आवाजाने भीतीदायक वातावरण ग्रामस्थांमधे झाले. पिंजराही ठेवला होता. दिवसभर वनविभागाचे कर्मचारी थांबले आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्यातील भीती कमी केली. बिबट्याचा वावर निश्‍चित आहे. अगदी बहूळ चिचोंशी पर्यंत बिबटे आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परिसर शांत झाल्याने बिबटे बाहेर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com