पुणेकरांनो, रुग्णांची योजनाच झाली "गरीब'; रुग्णांअभावी 24 कोविड सेंटर बंद 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

कोरोनाचा पसार वाढत असतानाच शहरी गरीब योजनेचा सर्व निधी संपल्याने तिच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची भीती आहे.तेव्हाच वर्गीकरणातून ५कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले

पुणे - गरीब रुग्णांना आधार ठरणाऱ्या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा तब्बल 42 कोटींचा निधी सहा महिन्यांतच संपला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या उत्पन्नातही फारसी वाढ होत नसल्याचे ही योजनाच "गरीब' झाली आहे. मात्र, रुग्णांवरील उपचारासाठी तूर्तास पाच कोटी रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्या खात्यामार्फत ही योजना राबविली जाते. त्यातून एका कुटुंबाला किमान उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत मिळते. पात्र रुग्णांच्या उपचाराचा खर्च हॉस्पिटलकडे जमा केला जातो. गेल्या काही वर्षांत या योजनेची व्याप्ती वाढवून अधिकाधिक रुग्णांना सामावून घेण्यात येत आहे. त्यामुळे तिचा वर्षाकाठचा किमान खर्च 30 ते 40 कोटी रुपयांपर्यंत जातो; मात्र कोरोनाची साथ आल्यानंतर योजनेच्या लाभासाठी महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. त्यातून आतापर्यंत 42 कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. कोरोनाचा पसार वाढत असतानाच शहरी गरीब योजनेचा सर्व निधी संपल्याने तिच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची भीती आहे. तेव्हाच वर्गीकरणातून पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांअभावी 24 कोविड सेंटर बंद 
कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी उभारललेल्या कोविड केअर सेंटरपैकी 24 सेंटर बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या सेंटरमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी कामे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्ण दाखल होत नसल्याने सेंटर बंद केल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 covid centers closed in Pune due to lack of corona patients