Crime News : दौंड शहरातून २४२८ किलो गोमांस जप्त; चार जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daund Police Station

Crime News : दौंड शहरातून २४२८ किलो गोमांस जप्त; चार जणांना अटक

दौंड : पुणे ग्रामीण पोलिसांच्या चार पथकांनी दौंड शहरात केलेल्या कारवाईत २४२८ किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. दौंड पोलिसांनी एकूण नऊ जणांविरूध्द स्वतंत्र गुन्हे दाखल करून गोमांस विक्री करणार्या चार जणांना अटक केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दौंड पोलिसांच्या साह्याने खाटीक दौंड शहरातील गल्ली येथे ही कारवाई केली. कारवाईत गोमांस विक्री करणारे शाहरूख अब्दुल कुरेशी (वय ३१ ), निसार अहमद कुरेशी ( वय ५५) ,

आयर्विन ऑगस्टिन डिक्रूज (वय ३६), सादीक रेहमान कुरेशी (वय ५२, चौघे रा. खाटीक गल्ली, दौंड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ८८ हजार रूपये मूल्य असलेले २४२८ किलो गोमांस जप्त करण्यात आले. फैजान कुरेशी हा गोहत्या करून सदर गोमांस जमील इस्माईल कुरेशी याच्याकडे विक्रीसाठी देत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

दौंड पोलिसांनी या प्रकरणी शाहरूख अब्दुल कुरेशी , निसार अहमद कुरेशी , आयर्विन ऑगस्टिन डिक्रूज , सादीक रेहमान कुरेशी याच्यासह लडडू उर्फ हसन कुरेशी, इरफान इब्राहिम कुरेशी, वसिम आबिद कुरेशी, फैजान कुरेशी, जमील इस्माईल कुरेशी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळिमकर व दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी ही कारवाई केली.

सदर कारवाईत सहायक निरीक्षक तुकाराम राठोड, फौजदार सतीश राऊत, महेश आबनावे, सहायक फौजदार सुरेश चौधरी, बबन जाधव, हवालदार असिफ शेख, पांडुरंग थोरात, विठ्ठल गायकवाड, किरण पांढरे, विकास गावडे, कॅान्स्टेबल रवींद्र काळे, योगेश गोलांडे, हेमंत भोंगळे, सागर गलांडे व अशोक जाधव यांनी भाग घेतला.

दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणार्या टोळीचा म्होरक्या अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी याच्यासह एकूण सात सदस्यांवर ८ मे २०२३ रोजी तडीपारीची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही गोहत्या करणार्या चार टोळ्या सक्रिय असल्याचे या निमित्ताने स्प्ष्ट झाले आहे.