
आळंदी : आषाढी वारीसाठी राज्यातून आलेल्या भाविकांना बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्य सेवा चोवीस तास उपलब्ध असेल. शहरातील खासगी रूग्णालयातील चाळीस टक्के बेड आपत्कालीन व्यवस्थेसाठी आरक्षित ठेवले आहेत. देउळवाड्यात ऑक्सिजन आणि ईसीजी सुविधेसह एक बेड तयार केला आहे.