

पुण्यात चंदननगरमध्ये २५ वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पहिली मुलगी झाल्यानं त्रास दिला आणि दुसर्यांदा गर्भवती असताना मुलगा आहे का चेक करा नसेल तर आमच्याकडे सोडू नका म्हणून पतीने सांगितल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय. याशिवाय चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी मानिसक आणि शारीरिक छळ केल्यानंच तिने आत्महत्या केली असल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे.