esakal | Coronavirus : अडीच हजार ऊसतोडणी कामगार भवानीनगरमध्ये अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane-workers

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सरकारने लॉकडाउन, जिल्हाबंदी यासारख्या उपाय योजना केल्या आहेत. त्यामुळे भवानीनगरमध्ये चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्‍यातील 350, नगर जिल्ह्यातील 1600 व बीडमधील 550 ऊसतोडणी कामगार अडकले आहेत.

Coronavirus : अडीच हजार ऊसतोडणी कामगार भवानीनगरमध्ये अडकले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - 'आम्हाला धान्य नको, जनावरांना चारा नको, आम्हाला आमच्या गावाकडे जाऊ द्या,' अशी मागणी ऊसतोडणी कामगार व त्यांच्या कुटुंबाने प्रशासन आणि कारखाना प्रशासनाकडे केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सरकारने लॉकडाउन, जिल्हाबंदी यासारख्या उपाय योजना केल्या आहेत. त्यामुळे भवानीनगरमध्ये चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्‍यातील 350, नगर जिल्ह्यातील 1600 व बीडमधील 550 ऊसतोडणी कामगार अडकले आहेत. तसेच, त्यांची पाच हजार जनावरेही सोबत आहेत. कारखान्याने मजुरांना अन्नधान्याचे किट दिले आहे. तसेच, जनावराच्या चाऱ्याचीही व्यवस्था केली आहे. गावी गेल्यानंतर तेथे आम्हाला काही दिवस गावाबाहेर ठेवा. पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या, अशी मागणी ऊसतोडणी कामगार करीत आहेत.

ऊसतोडणी मजुरांना अन्नधान्य व जनावरांना चारा देण्यात येत आहे. तरीही कामगार गावाकडे जाण्याची मागणी करीत आहेत.
- प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना

जिल्हाबंदीमुळे कामगारांना सोडता येत नाही. ऊसतोडणी कामगार गावाकडे जाऊ देण्याची मागणी करीत असून यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.
- दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक, वालचंदनगर
.......
Wal12p1
भवानीनगर (ता. इंदापूर) : गावाकडे जाऊ देण्याची मागणी करणारे ऊसतोडणी कामगार....77820

loading image