पुणे - शहरात परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश नवल किशोर राम यांनी दिल्यानंतर आकाशचिन्ह विभाग कामाला लागला आहे. आज (ता. ८) एका दिवसात १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ७१ जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांना पत्र दिले आहे. तर २७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.