कोरोनाने उडवली पोलिस दलात खळबळ; एकाच ठाण्यातील २७ जणांना...!

Police
Police
Updated on

पुणे : शहरवासियांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.१) शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत चार ठाण्यातील आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाजीनगर परिसरातील एका पोलिस ठाण्यातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ठाण्यातील सर्वच 27 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोना झालेल्यामध्ये एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. यामुळे शहर पोलिस दलात एकाच खळबळ उडाली आहे. शहर पोलिस दलातील 125 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांश पोलिस कर्मचारी हे बरे झाले असून काहीजण पुन्हा कामावर परतले आहेत.

शहराच्या पश्चिम भागातील एका पोलिस ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करीत असलेले 10 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ससून हॉस्पिटलजवळील एका पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस दलाच्या एका महत्वाच्या विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला करोणाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली गेली. ज्यांना क्वारंटाईन करण्याची आवश्‍यकता असेल त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल. 
- रविंद्र शिसवे, सह पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com