'मुख्यमंत्री साहेब, पालखी सोहळ्यासाठी वापरलेल्या 'त्या' बस...'; वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काय घातले साकडे?

Palakhi_Bus
Palakhi_Bus
Updated on

पुणे : पालखी सोहळ्यासाठी प्रथमच वापरलेल्या आणि माऊलींच्या पादुका स्पर्शाने पवित्र झालेल्या बस आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि देहू देवस्थान ट्रस्टकडे कायमस्वरूपी सुपूर्द कराव्यात. या बसचा पुढील काळात व्यावसायिक वापर करू नये, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून तर जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी देहूतून दरवर्षी पंढपूरला जाते. यंदा मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे हा सोहळा पायी वारीने पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे ही परंपरा खंडीत न करण्यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाच्या दोन बस वापरल्या. त्यातून दोन्ही पालखी पंढरपूरला पोचल्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायाच्या अस्मिता व आस्थेच्या प्रश्नावर तोडगा निघाला. 

या वर्षी पालखी सोहळ्याची ही वेगळी परंपरा सुरू होऊन त्याला महत्त्व प्राप्त झाले. ज्या बसमधून ज्ञानोबा माऊली आणि तुकोबाराय यांच्या पादुका पंढपूरकडे मार्गक्रमण झाल्या त्या दोन्ही बसबाबत राज्य सकारने वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे. या दोन्ही बस कायमस्वरूपी माऊलींच्या सेवेसाठी एक बस आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि एक बस देहू देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द कराव्यात. जर त्या बस भाडेतत्वावरील असल्यास राज्य सरकारने त्या खरेदी करून देवस्थानाच्या ताब्यात द्याव्यात. त्यामुळे या बसचा भविष्यात व्यावसायिक वापर होऊ नये आणि देवस्थानाला गरज पडेल तेथे त्यांचा वापर होऊ शकतो.

तसेच माऊलींच्या पालखीसोबत शासनाचा संदेश घेऊन दरवर्षी या बस पालखी सोहळ्यातही संस्थांनामार्फत सहभागी होतील. दोन्ही माऊलींच्या पादुकांचा स्पर्श झाल्याने त्या बस बरोबर वारकऱयांचे आणि भक्तांचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सर्वसामान्य शेतकरी व वारकरी संप्रदायाच्या आस्थेचा मुद्दा असून या वर आपण तातडीने निर्णय घेऊन दोन्ही बस दोन्ही संस्थांनांच्या ताब्यात वर्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, असे तांबे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com