जिल्ह्यातील छावण्यांसाठी 28 कोटी

दीपक शिंदे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

चारा छावण्यांच्या अनुदानाची 28 कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत पैसे छावण्यांना मिळतील, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

बावडा : चारा छावण्यांच्या अनुदानाची 28 कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत पैसे छावण्यांना मिळतील, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
 
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या जनावरांच्या छावणीस महादेव जानकर यांनी भेट दिली. इंदापूर तालुक्‍यातील सर्वांत मोठी म्हणून या छावणीची ओळख आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. चांगला पाऊस झाल्यानंतर चारा उत्पादन होण्यास दोन महिने कालावधी लागतो. त्यामुळे चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यात येतील, असे जानकर सांगितले. प्रास्ताविक भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जिल्बा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले. ॉ

राष्ट्रीय समाज पक्षाच्या सहकार्याशिवाय राज्यात युती सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. युतीकडे विधानसभेच्या 52 जागांची मागणी आम्ही केली आहे.
महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 Crore Rupees For Fodder Camp In Pune District