
- प्रकल्पात 28.73 टीएमसी पाणीसाठा
- उजनी धरण 91 टक्क्यांवर
पुणे : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गतवर्षी 28 ऑगस्ट रोजी 28.65 टीएमसी (98.27 टक्के) पाणीसाठा होता. तर, यंदा आजअखेर 28.73 टीएमसी (98.54 टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, तो गतवर्षीच्या तुलनेत 0.08 टीएमसीने जास्त आहे.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही तीन धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, टेमघर धरणात सध्या 3.28 टीएमसी (88.49 टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला धरणातून शुक्रवारी सकाळी मुठा नदीपात्रात 856 क्युसेकने आणि कालव्यातून 1054 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पानशेत धरणातून विसर्ग बंद आहे. उजनी धरणात 48.96 टीएमसी (91.40 टक्के) पाणीसाठा झाला आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील मुळशी, कळमोडी, आंद्रा, भाटघर, नीरा देवघर, वीर, गुंजवणी आणि नाझरे ही धरणे पूर्ण भरली आहेत. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि विसापूर या धरणांत 30 ते 45 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस :
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीतून 9 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 7 मिमी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8 मिमी पाऊस झाला.
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी :
टेमघर 3.28 (88.49)
वरसगाव 12.82 (100)
पानशेत 10.65 (100)
खडकवासला 1.97 (100)
इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 6.49 (85.64)
पवना 7.88 (92.56)
मुळशी 18.46 (100)
भाटघर 23.50 (100)
नीरा देवघर 11.73 (100)
वीर 9.41 (100)
गुंजवणी 3.69 (100)
उजनी 48.96 (91.40)