esakal | पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी

पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

पुणे : गणेश पेठेतील चार मजली इमारत विक्रीचा बहाणा करून कोटी लाख रूपये घेउन जेष्ठाला प्रॉपर्टीची विक्री न करता सराईत आंदेकर आणि घिसाडी गॅंगची भीती दाखवून व्यवहाराव्यतिरिक्त कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक आत्माराम शर्मा, सीमा अशोक शर्मा, हेमंत आत्माराम शर्मा (मयत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामचंद्र तोताराम मुलतानी (वय 72, रा. नगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र मुलतानी हे व्यापारी आहेत.

हेही वाचा: पुण्यात वाहन RC सह नवीन लायसन्सचेही कामकाज बंद

फिर्यादी व आरोपी अशोक शर्मा हे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांचे व्यापारी संबंध आहेत. त्यातूनच 2016 मध्ये अशोक शर्मा याने फिर्यादी रामचंद्र यांना गणेश पेठेतील चार मजली इमारत विक्री करण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून वेळोवेळी 4 कोटी 80 लाख रूपये घेतले. त्यानंतर अशोक यांनी रामचंद्र यांना चार मजली इमारतीची व्रिकी न करता त्यांची फसवणूक केली.त्यानंतर त्याने फिर्यादीस सराईत आंदेकर आणि घिसाडी गॅंगची भीती दाखवून त्यांच्याकडून ठरलेल्या व्यवहाराव्यतिरिक्त 3 कोटी रूपये जास्तीची मागणी केली. त्याचबरोबर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.