पुणे : तीन लाखांची बनावट मद्यसाठा जप्त; एकास अटक

Liquer
Liquer
Updated on

पुणे : बनावट देशी व विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घालून कारवाई केली. बनावट मद्य, मद्य बनविण्यासाठीचे साहित्य तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

नवनाथ विलास भुजबळ असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंडमधील कानगाव येथे बनावट देशी व विदेशी मद्याची वाहतुक केली जात असल्याची मंगळवारी सकाळी खबर पथकाला मिळाली. त्यानुसार, विभागाच्या पथकाने संबंधीत ठिकाणी सापळा रचून एक संशयास्पद अल्टो कार ताब्यात घेतली आहे.

फास्टटॅग अपडेट नाही; चालकांना भुर्दंड

कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये अडीच लाख रुपये किंमतीचे बनावट देशी व विदेशी मद्याचे 4 बॉक्‍स आढळले. त्यानंतर पथकाने नवनाथ भुजबळ यास ताब्यात घेतले. संबंधीत बनावट मद्य हे तळेगाव ढमढेरे येथे तयार केले जात असल्याची माहिती चौकशीमध्ये पुढे आली. त्यानंतर पथकाने मंगळवारी मध्यरात्री तेथे जाऊन छापा घातला. तेथून 140 लिटर मद्यार्क साठा, विविध ब्रॅंडची 5300 बुचे, इसेन्स, विविध ब्रॅंडच्या रिकाम्या बाटल्या, 51 हजार रुपयांचा मद्यसाठा आढळला.बनावट मद्य बनविणारा एक आरोपी तेथून पळून गेला.

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द 

विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधिक्षक संतोष झगडे, उपअधिक्षक्ष एस.आर.जाधव, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए.जी.बिराजदार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक विकास थोरात, प्रशांत धाईंजे, जवान बी.के.एडके, नवनाथ पडवळ, केशव वामने, आर.बी.सावंत,महिला जवान मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com