पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचे 3 महिन्यांचे वेतन पुन्हा थकले

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचे 3 महिन्यांचे वेतन पुन्हा थकले.
Salary
SalarySakal
Summary

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचे 3 महिन्यांचे वेतन पुन्हा थकले.

विश्रांतवाडी - पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal) कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचे (Contract Security Employee) 3 महिन्यांचे वेतन (Salary) पुन्हा थकले. (Arrears) सर्व कर्मचार्‍यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रशासनास जाब विचारला. क्रिस्टल कंपनी ही एका भाजपाप्रणित आमदाराची कंपनी आहे. ही ब्लॅकलिस्टेड कंपनी असूनही या कंपनीला पुणे महानगरपालिकेने कंत्राट दिले आहे. दिवाळीच्या दरम्यान अशाच रितीने वेतन थकल्याने सुरक्षारक्षकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले होते. त्यावेळी 200 लोकांचे पगार देण्यात आले होते. परंतु इतरांचे पगार दिले नव्हते. त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच वाढलेली महागाई, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Salary
मॅट्रीमोनी साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २४ लाखांची फसवणूक

आता तीन महिन्यांनंतर सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन त्वरित काढावे, या मागणीसाठी या सुरक्षारक्षकांनी पुन्हा अजित पवार यांची भेट घेतली. यासंदर्भातील निवेदन अजित पवार यांचे स्वीय सहायक राम चौबे आणि अनिल वेदपाठक यांनी स्वीकारले. लगेचच या प्रश्नाची दखल घेऊन त्यांनी पालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता पालिका प्रशासनाने वेतनासाठी 4 दिवसांत प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी विनोद मुरलीधर पवार, सुरक्षारक्षक आशिष परदेशी, राहुल पवार, ममता गायकवाड, अनिता जगताप, विक्कीराज शिंदे, आकाश लोखंडे आदी उपस्थित होते. यासंदर्भात ममता गायकवाड म्हणाल्या की आमचे घरभाडे कित्येक महिने थकले आहे. त्वरित वेतन नाही मिळाले, तर खायचे काय हा प्रश्‍न समोर आहे. यासंदर्भात संबंधित मनपा अधिकारी माधव जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com