Amol Satpute : बिबट्यासाठी ३० पिंजरे व २० ट्रॅप कॅमेऱ्यासह ड्रोन कॅमेऱ्याव्दारे मागोवा; उपवनसंरक्षक अमोल सातपुते

या परिसरात ५० वनकर्मचारी पायी गस्त घालत असून जनतेमध्ये जनजागृती करत आहेत.
बिबट्या
बिबट्याईसकाळ

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, पिंपळवंडी,काळवाडी परिसरातील बिबटे पकडण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून परिसरात ३० पिंजरे व २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्याव्दारे बिबटयाचा मागोवा घेण्यात येत असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

बिबट्या
Nandurbar Crime News : राणीपूर येथे अवैध बियरचा साठा जप्त; म्हसावद पोलिसांची कारवाई

या परिसरात ५० वनकर्मचारी पायी गस्त घालत असून जनतेमध्ये जनजागृती करत आहेत.परिसरातील नागरिकांनी शेतात काम करताना एकटयाने न जाता समुहाने जावे. काम करत असताना आवाज करावा तसेच सावधानता बाळगावी. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये दक्षता घ्यावी अधुन मधुन फटाके फोडुन आवाज करावा. शेतशिवारात असलेल्या घरांच्या अनुषंगाने लहान मुलांना/वृध्दांना घराच्याबाहेर एकटे सोडु नये घराबाहेर उघड्यायावर झोपू नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बिबट्या
Sangli News : दिवसाढवळ्या 'खून करणारं गाव' म्हणून मिळाली ओळख, पण प्रवाहाच्या विरोधातही उभं राहिलं गाव!

जुन्नर वनविभागात ओतूर वनपरिक्षेत्रातील पिंपरीपेंढार ता.जुन्नर येथे आज शुक्रवार ता.१० बाजरी पिकाची राखण करणाऱ्या नानाबाई कडाळे वय ४५ या महिलेवर बिबटयाने हल्ला करुन ठार केले आहे. याबाबतची माहिती मिळताच जुन्नर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच माणिकडोह रेस्क्यु टिम सह घटना स्थळी तात्काळ पोहचले. याच घटनेच्या पाच किलोमीटर परिसरातील पिंपळवंडी, ता. जुन्नर येथे ता.५ मे रोजी कोबीच्या शेतात खुरपणी करत असताना आश्विनी हुलवळे या महिलेवत शेजारील ऊसाच्या शेतात धबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करुन ऊसाचे शेतात फरपटत नेले ह्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झालेली आहे.

तसेच काळवाडी ता. जुन्नर येथे ता.०८ 08.05.2024 रोजी सकाळी रुद्र फापाळे, वय ८ या मुलावर बिबट्याने हल्ला करुन त्याला ठार केले आहे. या घटनांच्या अनुषंगाने जुन्नर वनविभागाकडून सदर परिसरात बिबट बंदिस्त करण्यासाठी युध्द पातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे असे सातपुते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com