esakal | शाहरूखच्या चित्रीकरणामुळे, मेट्रोच्या तिजोरीत ३० लाख
sakal

बोलून बातमी शोधा

 Shahrukh Khan

शाहरूखच्या चित्रीकरणामुळे, मेट्रोच्या तिजोरीत ३० लाख

sakal_logo
By
मंगेश कोळपकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर आणि पंपरी चिंचवडमधील मेट्रोचे मार्ग सुरू होण्यापूर्वीच मेट्रो स्थानकावर झालेल्या चित्रीकरणामुळे मेट्रोच्या तिजोरीत उद्घाटनापूर्वीच ३० लाखांची रोकड जमा झाली आहे. बॉलिवडचा सुपरस्टार शाहरूख खान त्यासाठी गेले दोन दिवस संत तुकारामनगर स्थानकावर चित्रीकरण आटोपून रविवारी सकाळी मुंबईला रवाना झाला.

हेही वाचा: मित्राच्या मदतीनं लेकीनेच उकळली खंडणी; पाहा व्हिडिओ

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. अल्पावधीतच या मार्गावरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या मार्गावर पिंपरी जवळील संत तुकारामनगर स्थानकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या स्थानकावर चित्रीकरणासाठी परवानगी मिळावी, यासाठी शाहरूखखान काम करीत असलेल्या चित्रपट निर्मात्या कंपनीने दोन महिन्यांपूर्वी महामेट्रोकडे परवानगी मागितली होती.

महामेट्रोने ३० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान त्यांना परवानगी दिली. त्यानुसार या स्थानकावर चित्रीकरण सुरू आहे. चित्रपट निर्मात्या कंपनीने चित्रपटाच्या नावाबद्दल आणि कथेबद्दल गोपनीयता बाळगली आहे. संत तुकारामनगर स्थानकावर चित्रीकरण करण्यासाठी महामेट्रोने प्रती दिन सुमारे दोन लाख रुपयांची आकारणी केली.

हेही वाचा: नगरसेविका बारसे यांचा आमदार लांडगे यांना घरचा आहेर

त्यामुळे महामेट्रोच्या तिजोरीत सुमारे ३० लाख रुपये जमा झाले. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता शाहरूख खान दोन दिवसांपूर्वी पुण्यात आला. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केले. त्याचे दोन दिवस शॉटस पूर्ण झाल्यावर तो रविवारी सकाळी मुंबईला रवाना झाला.

दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतलीकुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर, अभिनेत्री नयनतारा, प्रिया मनी, कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आदी या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रीकऱणादरम्यान मेट्रो स्थानकावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. खासगी व पोलिस बंदोबस्तही कडक होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

loading image
go to top