पवनमावळातील भडवली गावातील ३० ते ४० नागरिकांना जेवणातून विषबाधा | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवनमावळातील भडवली गावातील ३० ते ४० नागरिकांना जेवणातून विषबाधा

पवनमावळातील भडवली गावातील ३० ते ४० नागरिकांना जेवणातून विषबाधा

पवनानगर : मावळ तालुक्यातील भडवली गावात गुरुवार (ता. १८) रोजी सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. त्यातुन ३० ते ४० नागरीकांना विषबाधा (फुड पॉझनिंग) झाल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात हा प्रकार घडला असुन बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार काल झालेल्या काकडा समाप्तीच्या सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. त्यांमध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेष आहे. ग्रामीण रुग्णालयातील तीनही वार्ड फुल झाले असुन काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलिस व वडगाव मावळचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

loading image
go to top