मजा करण्यासाठी चोरलेल्या तीस दुचाकींचा वारजे पोलिसांनी लावला छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

चैन करण्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीस दुचाकी चोरल्या गेल्या.

मजा करण्यासाठी चोरलेल्या तीस दुचाकींचा वारजे पोलिसांनी लावला छडा

वारजे - चैन करण्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीस दुचाकी चोरल्या गेल्या. या चोरीचा तपास वारजे पोलिसांनी मोठ्या शिताफीने करून या तीस दुचाकी चोरणाऱ्या तरुणांना अटक केली आहे.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर तसेच इतर भागातील डी मार्टच्या पार्किंग मधून दुचाकी चोरी होत असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस तपास पथकातील अंमलदार प्रदीप शेलार व नंदकिशोर चव्हाण यांनी कर्वेनगर येथील डी मार्ट मधील पार्किंगचे जवळपास 30 तासाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित दुचाकी चोरास त्याच्या गॅरेज मधून ताब्यात घेतले. सागर अशोक चव्हाण (वय -27 वर्ष रा. शॉप नंबर 8, व्यंकटेश लेक लाइफ सोसायटी जांभूळवाडी रोड दत्ता नगर), संदीप संपत आंधळे (वय 21 वर्ष, रा. श्रीगणेश बिल्डींग गुजरवाडी फाटा, कात्रज), आकाश वसंत लोखंडे (वय 22 वर्ष, रा. रामनगर वारजे माळवाडी) या तिघांना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वारजे माळवाडी, अलंकार, हवेली, हडपसर, वाकड,चतुर्श्रुंगी, हिंजवडी, पिंपरी या परिसरातील डी मार्ट शॉपिंग मॉल सारख्या गर्दी असणाऱ्या ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली पैकी पाच हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर एकूण अठरा गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये त्यांनी आतापर्यंत एकूण तीस दुचाकी चोरल्या असल्याचा संशय वारजे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

यामध्ये अनेक दुचाकी तोडून विकण्यात आलेल्या आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे व पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, रामेश्वर पारवे, मंदार शिंदे, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत विजय भुरूक, नंदकिशोर चव्हाण, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे, हेमंत रोकडे यांनी केली आहे.

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करताना घेतले ताब्यात

जांभूळवाडी रस्त्यावरती विघ्नहर्ता गॅरेजमध्ये संशयित आरोपी सागर चव्हाण व संदीप आंधळे हे दोघे आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस केक कापून साजरा करत होते. त्याच ठिकाणी वारजे पोलीस वेशांतर करून गेले होते. पोलिसांनी या संशयित आरोपींना ओळखल्याने त्यांनी त्याच्यावरती झडप घालून पकडले. आणि त्याच गॅरेजमध्ये चोरीच्या दुचाकी व इतर गाड्यांच्या तोडलेल्या नंबर प्लेट ताब्यात घेतल्या.

Web Title: 30 Two Wheeler Seized By Police Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..