नैराश्यातून 'एमपीएससी' करणाऱ्या आणखी एका तरुणाने संपवलं जीवन, पुण्यातील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

30 year old  MPSC student committed suicide due to depression in Pune

नैराश्यातून 'एमपीएससी' करणाऱ्या आणखी एका तरुणाने संपवलं जीवन, पुण्यातील घटना

पुणे : हजारो तरूण एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून पुणे शहरात येतात दरम्यान अशाच एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून त्रिभुवन कावले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, त्रिभुवन हा जालना जिल्ह्यातील असून जानेवारी 2021 पासून पुण्यात त्याच्या मित्रांसोबत राहत होता. आज दुपारच्या सुमारास त्याने राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असून याला कोणी जबाबदार नाही असे चिठ्ठीत नमूद आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे

हेही वाचा: IIT Bombay : मोहालीनंतर IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार, एकाला अटक

Web Title: 30 Year Old Mpsc Student Committed Suicide Due To Depression In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsmpsc