esakal | राज्याकडे महापालिकेचे ३०० कोटी रुपये थकीत
sakal

बोलून बातमी शोधा

pune corporation file photo

राज्याकडे महापालिकेचे ३०० कोटी रुपये थकीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: महापालिकेला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागतात. असे असताना राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्काचे ३०० कोटी अद्याप मिळालेले नाहीत. हे पैसे मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप केवळ ३४ कोटी रुपयेच जमा झाले आहेत.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी महसूल समितीची बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या मिळकत कर विभागाने नुकताच १ हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. यंदा चार महिन्यांत प्रथमच २२ हजार नव्या मिळकतींची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाभरात ४२ हजार मिळकतींची नोंद झाली होती. यंदा नव्याने आलेल्या २३ गावांमधील घरांची, इमारतींची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे.

तसेच बेकायदा बांधकामांवर कर आकारणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यावर्षी बांधकाम शुल्कातून १ हजार १८५ कोटी रुपये इतके उत्पन्न गृहीत धरले आहे. पहिल्या पाच महिन्यांत सहाशे कोटी रुपये जमा झाले आहेत. जीएसटीमधून २ हजार १९३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचा वाटा राज्य सरकारकडून नियमितपणे येत आहे. तसेच मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे तीनशे कोटी रुपये राज्य सरकारकडे थकले आहेत.

हेही वाचा: पुणे: डीएसके कार प्रकरण; ४३ लाखांची फसवणूक

ही थकबाकी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातील पहिला ३४ कोटी रुपये महापालिकेला मंगळवारी मिळाले आहे. उर्वरित रक्कम ही दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने महापालिकेला मिळेल. यावर्षी साधारणपणे साडे हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळू शकेल. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

loading image
go to top