esakal | धक्कादायक, बारामतीतील 31 जण कोरोनाबाधिताच्या संपर्कात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. गावात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येत आहेत. तसेच, कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

धक्कादायक, बारामतीतील 31 जण कोरोनाबाधिताच्या संपर्कात

sakal_logo
By
संतोष आटोळे

शिर्सुफळ (पुणे) : बारमती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे 31 मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर गाव व परिसर सील करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (हाय रिस्क) 31  लोकांना आज (ता. 1) बारामती येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. आता या भागातील ग्रामस्थांना अहवालाची प्रतिक्षा लागली आहे. संपूर्ण परिसर चिंतातूर बनला आहे. गाव बफर झोन घोषित करीत प्रशासनाने सील केले आहे.

कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

मूळचे सिद्धेश्वर निंबोडी येथील असलेले व पुणे पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी 17 मे रोजी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सिद्धेश्वर निंबोडी येथे आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ते पुन्हा पुणे मुख्यालयात हजर झाले. मात्र, दोन- तीन दिवसानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 मे रोजी त्यांच्या हाय रिक्स संपर्कात आलेल्या त्यांची आई, वडिल, मुलगा व पुतण्या यांची चाचणी करण्यात आली.या मध्ये वडील (वय 65) व मुलगा (वय 14) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

एकीकडं आयटीयन्सना नोकरीची भीती, त्या आता या आजाराने ग्रासलं!

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. गावात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात येत आहेत. तसेच, कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना 
गावात कोरोना रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ गावात औषध फवरणी, ग्रामस्थांमध्ये जागृतीसाठी फलक, स्पिकरवरुन सुचना दिल्या जात आहे. गाव परिसर बंद करण्यात येत आहे. तसेच, घाबरुन न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच मनीषा किशोर फडतरे व ग्रामसेवक महादेव सालगुडे यांनी केले आहे.

गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी 
शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून आरोग्य कर्मचारी, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्याकडून गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देत त्यांची माहिती घेण्यात येईल, तसेच कोणाला काही आजार आहेत का, याच्यासह ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज खोमणे व शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोज चौधरी यांनी दिली.