एकीकडं आयटीयन्सना नोकरीची भीती, त्यात आता 'या' आजाराने ग्रासलं!

सुधीर साबळे
Sunday, 31 May 2020

लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे तरुणांमध्ये चिंतारोगाचे प्रमाण वाढले आहे. एरवी चार टक्क्यांपर्यंत असणारे हे प्रमाण पंधरा टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. सध्याची स्थिती अशीच राहिली तर यामध्ये वाढ होऊ शकते.
- डॉ. विद्याधर वाटवे, मानसोपचार तज्ज्ञ

पिंपरी - दोन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे विस्कळीत झालेल्या अर्थचक्राने अनेकांवर नोकरी गमावण्याचे संकट ओढावले आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अचानक नोकरी जाणे, पगार कपात, कायम असुरक्षिततेची भावना अशा कारणांमुळे ‘आयटीयन्स’ना चिंतारोगाची समस्या सतावू लागली आहे. पूर्वी चार टक्क्यांपर्यंत असणारे हे प्रमाण लॉकडाउनच्या काळात १५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अशी आहे सद्यःस्थिती
सध्या ‘आयटीयन्स’ना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसारखी सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी त्यांना रोजच्या जीवनात कधीही न येणाऱ्या ताणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकेवर होत आहे.

भोसरीतील कामगारांचे थकीत वेतन मिळवून देणार : मेधा पाटकर

‘सोशल मीडिया’वरून मार्गदर्शन  
नोकरी गेल्यानंतर मनावरील ताण कमी करण्यासाठी आयटीयन्सना व्हिडिओंच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम संघटनांकडून सुरू करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडून ‘सोशल मीडिया’द्वारे मार्गदर्शक संवाद साधण्यात येत आहे, असे राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी सांगितले.

दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 26 जण बरे; कोणत्या भागातील आहेत पाहा... 

निद्रानाश, नैराश्‍य

  • वर्क फ्रॉम होममध्येही अस्थिरतेची भावना
  • नोकरी गेल्याचे समजल्यानंतर बसणारा धक्‍का
  • सततच्या ताणामुळे अनेकांच्या चिडचिडीत वाढ
  • चिंतारोगामुळे निद्रानाश, नैराश्‍याची भावना

मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवण्यासाठी 

  • मानसिक स्वास्थ्य बिघडू न देता, सकारात्मक विचार करा
  • खचून न जाता नवीन नोकरी, व्यवसाय शोधा
  • खर्च कमी करण्याची सवय लावा 
  • मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा

वयोगटानुसार चिंताग्रस्त
३०-४० वयोगट - 10%
४०-५० वयोगट - 15%


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Itians in Tension