
पुणे : महापालिकेमध्ये आतापर्यंत ३२ गावे समाविष्ट झाली आहेत. संबंधित गावांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांसाठी अजूनही झगडावे लागत आहे. त्यातच संबंधित गावांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात झाडपडी, पाणी शिरण्यासारख्या घटना घडल्यास तत्काळ मदतीला धावून येणारी सक्षम यंत्रणा नाही. या भागात अजूनही महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांची वानवा आहे.