पुण्यात रुग्ण अन् मृत्यूच्या आकड्यांचा नवा उच्चांक; पहिल्यांदाच आढळले ३ हजाराहून अधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जुलै 2020

पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५९ हजार ६३४ झाली आहे. मंगळवारी(ता.२१) रात्री नऊ वाजल्यापासून बुधवारी (ता.२२) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता.२२) दिवसभरात तब्बल ३ हजार २१८ नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. मागील चार महिन्यांमधील दिवसभरातील एकूण कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूचा बुधवारी उच्चांक नोंदविला गेला आहे. 

तसेच दिवसभरात तब्बल ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दीड हजारांचा आकडा बुधवारी ओलांडला आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत तब्बल ८१५ ने वाढ झाली आहे. तसेच मृत्युंची संख्याही ७ ने वाढली आहे.

 ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी नेमायला अडचण काय? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल​

एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६२५ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी नोंदल्या गेलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील १ हजार १८९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २८६ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५९ हजार ६३४ झाली आहे. मंगळवारी(ता.२१) रात्री नऊ वाजल्यापासून बुधवारी (ता.२२) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. 

Breaking : गणेशोत्सवाबद्दल पुणे महापौरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर!​

बुधवारी मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३३, पिंपरी चिंचवडमधील १८ आणि ग्रामीण भागातील सहा, नगरपालिका क्षेत्रातील चार आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील एका जणाचा समावेश आहे.

मृत्यूचा आकडा दीड हजार क्रॉस
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दीड हजाराचा आकडा बुधवारी क्रॉस झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3218 new corona patients have been reported in Pune city and district on Wednesday 23rd July