भोसरी पोलिसांकडून चोरीची 33 वाहने जप्त

संदीप घिसे 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पिंपरी (पुणे) : मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 33 वाहने हस्तगत केली.

पिंपरी (पुणे) : मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 33 वाहने हस्तगत केली.

सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले. 

अशी होती वाहन चोरीची पद्धत आरोपी महाविद्यालयांमध्ये जाऊन पार्किंगमधील वाहनांची पाहणी करत असे. ज्या दुचाकीला चावी आहे अशा दुचाकी तो चोरीत असे. त्यानंतर चोरी केलेल्या दुचाकी आपल्या मित्राच्या मदतीने  विकत असे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर,  फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: 33 vehicles seized by police in bhosari