Corona Virus :  निवारा केंद्रात ३४६ कामगारांना मिळाला तात्पुरता आसरा

346 workers get temporary shelter center in pune
346 workers get temporary shelter center in pune
Updated on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कामगार आपल्या गावी करीत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने महापालिकेच्या सहकार्याने निवारा केंद्रात १०२ तर महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती निवारा केंद्रात २४४ अशा एकूण ३४६ कामगारांना आधार दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढन्याची शक्यता गृहीत धरुन व संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने शहरातील काही कामगारानी आपापल्या गावाची वाट धरल्याचे चित्र पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. कामगार  त्यांच्या गावी गेल्यास कोरोना संसर्ग गावापर्यन्त पोचन्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच  कामगारांचे गावी होणारे स्थलांतर थांबविन्यासाठी पुणे पोलिसांकडुन प्रयत्न केले जात आहे. पोलिस व महापालिका यांच्यावतीने काही कामगारांसाठी काही ठिकाणी निवारा केंद्र उभारली जात आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.त्यानुसार शहरामध्ये विविध ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रापुढे आव्हान : कोरोना रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे?

वा येवलेवाडी : सदाशिव उर्फ बापू दरेकर प्राथमिक शाळा (कोंढवा खुर्द), कोथरुड :मनपा शाळा क्रमांक १३९, बी. कै.अण्णासाहेब पाटील प्राथमिक शाळा (शास्त्रीनगर, कोथरुड), विश्राम बाग वाडा : वा.ब.गोगटे विद्यालय (नारायण पेठ),  भवानी पेठ : क्रांतिवर लहुजी वस्ताद साळवे प्राथमिक शाळा, वानवडी रामटेकडी : संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, बिबवेवाडी : पप्पा शेठ खन्ना प्राथमिक शाळा, येरवडा : कर्नल यंग प्राथमिक शाळामध्ये एकूण २४४ जणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

coronavirus: पुणे पोलिसांकडून 3665 जणांना "क्‍युआर कोड" 

"कामगार बाहेर गावी जात आहेत, त्यांना थांबवून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जात आहे. पोलिस महापालिकेच्या मदतीने आतापर्यंत चार निवारा केंद्र व ८ तात्पुरती निवारा केंद्रामध्ये ३४६ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे."
- डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com