

AB Form Distribution Controversy Fuels Rebellion in Hadapsar Municipal Polls
esakal
-कृष्णकांत कोबल
हडपसर : येथील १५-१६-१७ या तीनही प्रभागातील बारा जागांसाठी अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ३४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच पक्षांनी ए-बी फॉर्म वाटपात कमालीची गुप्तता पाळत ऐनवेळी उमेदवार आयात करून उमेदवारी दिल्याने त्या त्या पक्षातील मूळ इच्छुक कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर आळवला. त्यामुळे पुढील तीन दिवस बंडखोरांना समजविण्यासाठी पक्ष नेतृत्वाला मोठी डोकेदुखी सहन करावी लागणार आहे.