
प्रलंबित मागण्यासाठी देशातील ३५ हजार स्टेशन मास्टर रजेवर जाणार; धनंजय चंद्रात्रे
पुणे : रेल्वेतील खासगीकरण बंद करा, स्टेशन मास्टरांच्या रिक्त तागा तात्काळ भरा, स्टेशन मास्टरांना सुरक्षा व ताण भत्ता द्या, नवीन पेन्शन याेजना रद्द करुन जुनी पेन्शन याेजना लागू करा, रात्रपाळी सिलींग मर्यादा ४३ हजार ६०० रुपयांचा आदेश रद्द करुन एक जुलै २०१७ पासूनचा रिकवरी आदेश परत घ्या, एम.ए.सीपी. चा फायदा एक जानेवारी २०१६ पासून द्या आदी विविध मागण्यांकरिता देशभरातील ३५ हजार स्टेशन मास्टर ३१ मे राेजी एक दिवसाची सामूहिक रजा घेणार आहे अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर असाेसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रात्रे म्हणाले , रेल्वे स्टेशन मास्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी यापूर्वी पाच टप्प्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करुनही अद्याप रेल्वे बाेर्डाने गांभीर्याने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही. अधिकाऱ्यांना ईमेल पाठविण्यात आले,रात्रीच्या पाळीवरील स्टेशन मास्तरांनी मेणबत्त्या पेटवल्या,एक आठवडा काळा बिल्ला लावून अंदोलन केले, एक दिवसाचा उपवास केला. इतके करूनही रेल्वे प्रशासनाने मागण्याची दखल घेतली नाही.येत्या काळात रेल्वे प्रशासनाने याेग्य प्रकारची भूमिका न घेतल्यास अंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.या पत्रकार परिषदेस विभागीय सचिव विश्वजीत किर्तीकर,मध्य रेल्वे सचिव एस.के.मिश्रा, कार्याध्यक्ष अजय सिन्हा,स्टेशन प्रबंधक दिनेश कांबळे आदी उपस्थित हाेते.
Web Title: 35000 Station Masters In Country Will Go On Leave For Pending Orders Dhananjay Chandratre Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..