पुणे : ५०० रुपयांची लाच घेताना सापडला; घरात सापडली तब्बल 36 लाखांची रोकड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

  • महापालिकेच्या मुकादमाकडे 36 लाखांची रोकड, 10 तोळे सोने 
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीमध्ये मुकादमाची मालमत्ता उघड

पुणे : नारळ व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे तब्बल 36 लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने आढळून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुकादमासह दोघांना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री मुकादमाच्या घरी झडती घेतली. न्यायालयाने दोघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुकादम सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55, रा. वडगावशेरी, नगररोड, क्षेत्रीय कार्यालय) आणि बिगारी गोपी मच्छिंद्र उबाळे (32, रा. वडगावशेरी, नगररोड क्षेत्रिय कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या नारळ विक्री स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी शर्मा व उबाळे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, तडजोडीअंती पाचशे रूपये देण्याचे निश्‍चित झाले होते. लाच स्विकारताना शनिवारी अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली होती. दरम्यान, दोघांना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार, विशेष न्यायाधीर एस.आर. नावंदर यांनी दोघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे "एसीबी'चे पोलिस उपअधिक्षक श्रीहरी पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास, महिलांसाठी मार्शल; आपकडून गॅरंटी कार्ड

दरम्यान, "एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री शर्मा याच्या घरी झडती घेतली. रात्रभर सुरू असलेल्या या झडतीमध्ये पोलिसांना तब्बल 36 लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने आढळून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 lakh in cash and 100g gold found in PMC mukadam