esakal | Positive Story: पुण्यात 'प्लाझमा ३६५ दिवस'! रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपक्रम

बोलून बातमी शोधा

Positive Story: पुण्यात 'प्लाझमा ३६५ दिवस'! रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपक्रम

Positive Story: पुण्यात 'प्लाझमा ३६५ दिवस'! रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपक्रम

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे : शहरासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना प्लाझमाची गरज पडत आहे. याचाच विचार करून सिद्धी फाउंडेशनतर्फे 'प्लाझमा ३६५ दिवस' हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे शहरातील अनेक रुग्णांना याचा फायदा होत आहे. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त रुग्णांना प्लाझमा देण्यात आला आहे. सीरियस रुग्णांना कोरोनातून बरे होण्यासाठी प्लाझमा उपयुक्त ठरतो आहे. याबाबत प्लाझमा थेरपीनं कोरोना बाधित रुग्ण बरे होत असल्याचं निरीक्षण अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. सामजिक बांधिलकीचा विचार करून सिद्धी फाउंडेशन मागील एक वर्षभरापासून प्लाझमा दानाचा उपक्रम राबवत आहे. यातून आतापर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे सध्याचा कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर यापुढेही ‘प्लाझमा ३६५ दिवस' हा उपक्रम वर्षभर राबविला जाणार असल्याचे सिद्धी फाउंडेशनचे संस्थापक मनोज छाजेड यांनी सांगीतले.

हेही वाचा: 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

मागील तेरा वर्षापासून सिद्धी फाउंडेशनतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरात दोन हजार पेक्षात जण रक्तदान करतात. तसेच शहरातील नागरिकांना ३५ ऑक्सिजन मशीनच्या माध्यातून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यासाठी अतिशय नियोजनबद्ध पुढील वर्षभर हा प्लाझमा ३६५ उपक्रम राबविला जाणार आहे. कोरोना रुग्णांना प्लाझमा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये प्लाझमा दानासाठी जनजागृती करण्याचं काम या मोहिमेअंतर्गत केले जाणार असल्याचे अध्यक्ष ललित जैन यांनी सांगीतले. यामध्ये जीतो पुणे, महावीर प्रतिष्ठान, रक्ताचे नाते ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड या संस्थांचा सहयोग मिळणार आहे.

  • - शहरातील सर्व कोविड सेंटरला संपर्क करणार

  • - २० कार्यकर्ते प्लाझमा दानाच्या जनजागृतीसाठी

  • - रोज पाच नागरीकांना प्लाझमा देण्यात येणार

  • - दररोज पुण्यात १५ ते २० नागरीकांना प्लाझमाची गरज

प्लाझमा ३६५ दिवस' हा उपक्रम वर्षभर राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून प्लाझमा देणाऱ्या व्यक्तीची अँटीबॉडी टेस्ट मोफत केली जाणार आहे. तसेच त्यांना पीक अँड ड्रॉप पण केले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.

- मनोज छाजेड, संस्थापक, सिद्धी फाउंडेशन

कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचा माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच फोनद्वारे आणि त्यांना भेटून प्लाझमा दानासाठी प्रोत्साहित करत त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली जाणार आहे. यामुळे अनेक रुग्णांनाचा जीव वाचणार आहे.

- ललित जैन, अध्यक्ष, सिद्धी फाउंडेशन